LCB : सोन्याचे दुकान फोडणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : सोन्याचे दुकान फोडणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
LCB : सोन्याचे दुकान फोडणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
LCB : सोन्याचे दुकान फोडणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : नगर : श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील सोन्याचे दुकान फोडणारी (Burglary) टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जालना येथून जेरबंद (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून ११ किलो २३० ग्रॅम चांदी असा एकूण १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २५), दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २८. दोघे रा. सिद्धार्थनगर, ता. जि.जालना), शिवाजी प्रल्हादराव सासनिक (वय ३६, रा.रेणुका माता मंदिराजवळ, गांधीनगर, जालना), अमित नंदलाल दागडिया (वय ३२, रा.खरपुडी रोड, हरी गोविंद नगर, जालना), अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…

१४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (LCB)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड क्र.३ मध्ये असलेल्या सोन्याचे दुकानात गोपीसिंग टाक याने त्याच्या साथीदारांसह चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच संशयित आरोपी हे जालना येथे आहेत. त्यानुसार पथकास आरोपी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी, घरफोडी असे १४ गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, रमीज राजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांच्या पथकाने केली.