Radhakrishna Vikhe Patil : नगर : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) देवस्थानमध्ये बनावट ॲपसह अतिरिक्त अनावश्यक कर्मचारी भरतीसह (Employee Recruitment) अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. राज्य सरकारने या प्रकरणीची गांभीर्याने दखल घेतली आहे. देवस्थानचे विश्वस्त- अधिकारी आणि गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांना सरकार आणि शनिदेवाच्या प्रक्षोभ सामोरे जावे लागणार आहे, असे स्पष्ट भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार
नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद
पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत नेहरू सभागृहात संवाद बैठकीचे आयोजन बुधवारी (ता.२३) केले होते. या प्रसंगी पत्रकारांशी राज्यातील विविध विषयांवरील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, (Radhakrishna Vikhe Patil)
यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच चांगला पाऊस झाला. राज्यातील धरणांची पाणी स्थिती चांगली आहे, परंतु, पावसानेनंतर ताणले आहे. काही भागात दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. धरणातील पाणी खरीप हंगामातील पिकांना देण्यासाठी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. हवामान विभाग, जलसंपदा आणि कृषी विभागाकडून आढावा घेऊन धरणातील पाणी वाटपाचे नियोजन केले जाईल.
राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांचे काही वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी संयमाने बोलले पाहिजे. परंतु, उत्साहाच्या भरात काही बोलल्याने काही वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी त्याबाबत खुलासा ही केलेला आहे. कृषी मंत्री किंवा इतर मंत्री बदलण्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या सरकारचे कामकाज जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळे विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक नाही. त्यामुळे केवळ आरोप केले जात आहेत. गृह राज्यमंत्री रामदास कदम यांच्या मुलाच्या बारच्या अनुषंगाने आरोप केले. केवळ आरोपावरून कोणाच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे योग्य नाही. चौकशीमध्ये कोणी दोषी आढळला तर राजीनामा घेणे योग्य आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे किंवा अजेंडा नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राजीनामे मागितले जात आहेत, असे ही ते म्हणाले.