Belwandi Police Station : बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथकाची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Belwandi Police Station

0
Belwandi Police Station :बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथकाची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Belwandi Police Station :बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथकाची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Belwandi Police Station : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या (Belwandi Police Station) हद्दीत घारगाव, कोळगाव परिसरात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी स्थापना केलेल्या विशेष पथकाने अवैध दारूविक्री करणाऱ्या हॉटेलवर छापा टाकून ५८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेलवंडी पोलीस ठाण्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार

गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपींची नावे

कुलदीप लगड, किरण मोळक, भाऊसाहेब साळुंके असे गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक यांनी स्थापना केलेल्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर-दौंड महामार्गावरील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव, घारगाव परिसरातील हॉटेल वर अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

तीन हॉटेलवर छापा; ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Belwandi Police Station)

त्या नुसार पथकाने बुधवार(ता. २३) कोळगाव येथील तीन हॉटेलवर छापा मारत ५८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलीस सुनील पवार, दिनेश मोरे, मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखिले, उमेश खेडकर, अजय साठे, अमोल कांबळे, सुनील दिघे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, विनोद पवार, यशवंत ठोंबरे, विनायक सोनवणे यांच्या पथकाने केली.