Ajit Pawar:’तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल तर बाहेर काढा आणि ‘ते’ लोकांसमोर येऊ द्या;हनीट्रॅपवरून अजित पवारांचा पवित्रा

0
Ajit Pawar:'तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊद्या;हनीट्रॅपवरून अजित पवारांचा पवित्रा
Ajit Pawar:'तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊद्या;हनीट्रॅपवरून अजित पवारांचा पवित्रा

Ajit pawar: एकदाच सांगतो दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडिओ असेल पेन ड्राईव्ह (Pen Drive)असेल तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना आव्हान (Challenge) दिले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणाची मुळं नाशिकपासून मुंबईपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप नेते प्रफुल लोढा यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध हनी ट्रॅप (Honey Trap) आणि पाॅक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नक्की वाचा : अखेर महायुतीचे ठरलं!महामंडळ वाटपासाठी ४४- ३३ -२३ चा फॉर्म्युला 

अजित पवार काय म्हणाले ? (Ajit Pawar)

हर्षल पाटीलच्या आत्महत्येवर अजित पवार यांनी भाष्य करताना सांगितले की, मला यादी द्या कुणाची बिले दिले नाहीत. बिले देण्याची प्रक्रिया आहे. आज सकाळी आमची एक बैठक झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला नेमले होते. त्याने त्याला पैसे दिले नाहीत. मी कंत्राटदारांची माहिती घेत आहे. तरीपण एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

अवश्य वाचा : लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार 

कृषिमंत्र्यांशी समोरासमोर बोलून चर्चा होईल’   (Ajit Pawar)

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला कृषिमंत्र्यांशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवार ते बोलतील. ते भिकारी म्हणाले, याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर भान ठेऊन वागा, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. मागे देखील असंच वक्तव्य घडलं. दुसऱ्यांदा देखील घडलं आहे. त्यामुळे समोरासमोर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.