Crime : विवाहितेचा छळ; अग्निशमन अधिकारी यांच्या कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल

Crime : विवाहितेचा छळ; अग्निशमन अधिकारी यांच्या कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल

0
Crime : विवाहितेचा छळ; अग्निशमन अधिकारी यांच्या कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल
Crime : विवाहितेचा छळ; अग्निशमन अधिकारी यांच्या कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल

Crime : नगर : विवाहितेचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ (Physical and Mental Torture) केल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील अधिकारी शंकर मिसाळ (Shankar Misal) यांच्यासह त्यांचा मुलगा भरत व कुटुंबीय विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पती आणि सासरच्या मंडळीकडून सातत्याने मारहाण शिवीगाळ पैशाची मागणी आणि जीविताला धोका असल्याचे फिर्यादीत (FIR) म्हटले आहे.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

यांच्याविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पती भरत शंकर मिसाळ, सासरे शंकर उत्तम मिसाळ, सासू कमल शंकर मिसाळ आणि नणंद धनश्री शंकर मिसाळ (सर्व रा. म्युन्सिपल कॉलनी, नालेगाव अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि भरत मिसाळ यांचा प्रेमविवाह २०१८ साली झाला होता. मात्र, विवाहानंतर लगेचच मानसिक छळाला सुरुवात झाली.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

माहेर कडून पैसे आणण्याचा तगादा (Crime)

सासरच्या मंडळींनी तब्बल ५ लाख ५० हजार रुपयाची मागणी करत वारंवार माहेर कडून पैसे आणण्याचा तगादा लावला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मे २०२४ ते जून २०२५ या कालावधीत मुंबईत राहत असताना पती भरत मिसाळ यांनी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.