Kiran Kale : किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी; २९ जुलैला होणार पुढील सुनावणी

Kiran Kale : किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी; २९ जुलैला होणार पुढील सुनावणी

0
Kiran Kale : किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी; २९ जुलैला होणार पुढील सुनावणी
Kiran Kale : किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी; २९ जुलैला होणार पुढील सुनावणी

Kiran Kale : नगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena (UBT)) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे (Kiran Kale) यांना महिला अत्याचार (Women Abuse) प्रकरणी येथील सहदिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी (Court custody) सुनावली असून याबाबत पुढील सुनावणी २९ जुलैला होणार आहे. सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी. के. पाटील यांनी न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान दुपारी काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी जामीन मिळण्यासाठी काळे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

शहरप्रमुख किरण काळे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे अहिल्यानगर महापालिकेतील ७७६ रस्त्यांच्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा व कागदपत्रे दिली होती. यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत या प्रकरणावर तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी पहाटेच मंगळवारी (ता.२२) पहाटे ३ वाजता अटक केली. तर मंगळवारी (ता.२२) काळे यांना न्यायालयामध्ये हजर केले होते.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी (ता.२९) होणार (Crime)

काळे यांचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ पुप्पाल यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडत दोन वर्षानंतर म्हणजे ७३० दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. स्कॉटलंड पेक्षाही अधिक वेगाने पोलिसांनी या घटनेचा तपास करून काळे यांना तात्काळ अटक केली, असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केले. तसेस कारवाई म्हणजे राजकीय सूडभावना असून, संबंधित महिलेने कर्जतहून (७० किमी अंतर) अहिल्यानगरमध्ये येण्यासाठी दोन वर्षे लावली, ही बाब संशयास्पद आहे, असे वकील पुप्पाल म्हणाले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर काळे यांना न्यायालयीन कोठडी दिली. या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी (ता.२९) होणार आहे.