LCB : नगर : स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) सूत्र हाती घेताच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (Kirankumar Kabadi) यांनी पारनेर तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
पिराजी विहुल आहेर, गोकुळ बाबाजी आहेर व रावसाहेब भगवंत ढोले, असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती
अवैध हातभट्टी सुरु असल्याची खात्रीशीर माहिती (LCB)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील पळसपूर शिवारात अवैध हातभट्टी सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून तीन संशयित आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ लाख ७८ हजारांचा मुद्देमाला हस्तगत केला. ही कारवाई पोलीस लोटके, सगर ससाणे, आकाश काळे, विशाल तनपुरे, महादेव भांड यांच्या पथकाने केली.