Supriya Sule:”दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण”? – सुप्रिया सुळे 

0
Supriya Sule:
Supriya Sule:"दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण"? - सुप्रिया सुळे 

Supriya Sule : दिल्लीतील (Delhi) खासदार (MP) आम्हाला थांबवून थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण आहे ? असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर टीका (Criticism) केली. राज्यात जे काही सुरू आहे. त्यावरुन मुख्यमंत्री नाराज आहेत. दिल्लीमध्येही त्याची मोठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाल्मिक कराडमागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट देऊन मंत्रिमंडळात घेणार असाल तर त्याला आम्ही विरोध करू,असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यामध्ये बोलत होत्या.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार

‘स्थानिक नेत्यांच मार्गदर्शन घेऊन पुढे जाणार’ (Supriya Sule)

पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांनी मीटिंग घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढच्या काही दिवसात होतील. स्थानिक नेत्यांच मार्गदर्शन घेऊन पुढ जाणार आहोत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

अवश्य वाचा : अखेर महायुतीचे ठरलं!महामंडळ वाटपासाठी ४४- ३३ -२३ चा फॉर्म्युला

‘मंत्र्याच्या रमीची दिल्लीत चर्चा’ (Supriya Sule)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात क्राइम वाढला आहे, पुण्यात देखील भरपूर क्राईम वाढलं आहे. राज्यावर आर्थिक बोजा वाढला आहे. राज्यासमोर मोठी आव्हान आहे. दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते, मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्र पक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे. दिल्लीतले खासदार मला थांबवून थांबवून विचारत होते की रमीचा काय प्रकार सुरू आहे, कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे. असे अनेक प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले जातात. राज्यात कुठलीही घटना घडली की देशभर जाते. राज्याची देशभरात प्रचंड वाईट इमेज तयार झाली आहे.”

ज्यावेळेस पहिला व्हिडीओ समोर आला त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामे द्या, स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत. महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार?असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.