Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा

Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा

0
Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा
Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा

Guru Purnima : नगर : जुलै रोजी शिरूर शाखेचा व 21 जुलै रोजी सावेडी (Savedi) शाखेचा गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) उत्सव साजरा झाला. दोन्ही शाखेतील क्लास मध्ये विद्यार्थ्यांनी गुरुपाद्यपूजन केले व त्यानंतर नृत्यातून विविध नृत्य रचना सादर करून गुरुवंदना देण्यात आली. दोन्ही शाखेत झालेल्या कार्यक्रमाचे निवेदनही त्या त्या शाखेच्या विद्यार्थ्यांनीच केले. आपल्या मनोगतात गुरू वर्षा पंडित (Varsha Pandit) यांनी लोप पावत चाललेल्या परंपरा पुन्हा रुजू होऊ पाहत आहेत हे पाहून समाधान वाटल्याचे व्यक्त केले.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

स्वाती ताम्हाणे यांच्या पुढाकारातून कार्यक्रम यशस्वी

शिरूरच्या सिनियर विद्यार्थिनी स्वाती ताम्हाणे यांच्या पुढाकारातून शिरूरचा हा कार्यक्रम सुंदर व यशस्वी रित्या संपन्न झाला. 21 तारखेला झालेल्या सावेडी शाखेच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच अशोकजी गांधी जरीवाला, विलासजी बडवे, विवेकजी वाडेकर आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. सावेडी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रति असलेल्या भावना आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी गुरू पाद्यपूजन केले. सुरुवातीला गायन विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन व त्यानंतर नृत्य विभागातील लहान गट व मोठा गट अशा सर्व मुलींनी विविध नृत्याविष्कार सादर करून गुरूंना नृत्यवंदना अर्पण केली.

Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा
Guru Purnima : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय शिरूर शाखा व सावेडी शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्सव केला साजरा

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

विद्यालयाच्या प्रतिष्ठेला साजेल असा कार्यक्रम सादर (Guru Purnima)

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन आणि सर्वांना सामावून घेऊन आपल्या विद्यालयाच्या प्रतिष्ठेला साजेल असा कार्यक्रम सादर केला. विशारदच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या अष्टनायिका तसेच नवरसांवर आधारित सुंदर नृत्यरचना सिनियर विद्यार्थ्यांनीनी सादर करून सर्व प्रेक्षक व पालकांची वाहवा मिळवली. गुरूंप्रती तसेच कलेप्रती असलेली श्रद्धा, आस्था विद्यार्थिनी सादर केलेल्या प्रत्येक रचनेतून प्रकर्षाने जाणवत होती. त्यानंतर पालकांपैकी कौस्तुभ काळे यांनी गुरूंची महिमा सांगताना गुरु कसा असावा त्याच्यात काय गुण असावेत असे प्रश्न विचारून सर्व प्रेक्षक व पालकांना ही त्या विचार प्रवाहात सामावून घेतले. या सर्व गुणांबरोबरच पंडित मॅडम शांत व क्षमाशील वृत्तीच्या आहेत, आमचे पाल्य अगदी योग्य गुरूंकडे शिकत आहेत हे आमचं भाग्यच आहे, अशा शब्दात उत्फूर्तपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या विद्यार्थीनींना संबोधन करताना वर्षा पंडित म्हणाल्या की गुरूप्रती असलेल्या निष्ठेने आणि प्रेमाने भारावून गेले आहे. अशीच निष्ठा आपल्या कलेवर कायम ठेवा. तुम्ही विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाचा मी आनंदाने स्विकार करते व तुम्ही ज्या भावनेने माझ्यातल्या गुरू तत्वाला आदर, सन्मान दिला आहे त्याच भावनेने मी माझ्या ज्ञात व अज्ञात गुरूंना व त्यांच्यातील गुरुतत्वाला हा आदर, सन्मान समर्पित करते. आणि विद्यार्थ्यांनीही हीच परंपरा पुढे सुरू ठेवावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना संबोधून गुरूंचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच रहावे, भविष्यात कितीही मोठे झालात तरी आपली संस्कृती व आपल्या परंपरा सोडू नये. आई वडील थोरामोठ्यांचा आदर करावा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी म्हणून कायम प्रयत्नशील राहावे, चांगले विचारच आपल्याला यशस्वी बनवतात, त्यामुळे यशस्वी व उज्ज्वल भविष्यासाठी चांगले विचार करावेत व प्रामाणिकपणे काम करत पुढे चालत रहावे.

विद्यार्थ्यांसाठी माझ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सदैव आहेत. दोन्ही शाखेच्या सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मिळून या दोन कार्यक्रमांचे अतिशय सुंदर नियोजन केले त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व श्री चंद्रकांत पंडित यांची भक्कम साथ लाभल्यामुळे आज इथवर पोचले असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केला.