Saiyaara Movie:‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका!९ दिवसांत कमावले तब्बल २२० कोटी

0
Saiyaara Movie:‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका!९ दिवसांत कमावले तब्बल २२० कोटी
Saiyaara Movie:‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका!९ दिवसांत कमावले तब्बल २२० कोटी

Saiyaara Movie: बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी (Mohit Suri) यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सैयारा’ हा चित्रपट १८ जुलैला रिलीज झाला आहे. मात्र चित्रपटाने रिलीज झाल्यापासून अवघ्या ९ दिवसांत २२०.७५ कोटींची कमाई करत ऐतिहासिक यश मिळवले आहे.

नक्की वाचा : शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी!मँचेस्टर कसोटी सामन्यात कॅप्टनने मोडले अनेक रेकार्ड  

सैयाराची प्रेक्षकांना भुरळ (Saiyaara Movie)

‘सैयारा’ हा एक रोमँटिक म्युझिकल लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा अभिनय क्षेत्रातील पहिलाच सिनेमा आहे. पहिल्याच चित्रपटातून या दोघांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे.त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना बांधून ठेवलं आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार अल्पावधीतच झपाट्याने लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या सादरीकरणाने विशेषतः जेन Z प्रेक्षक वर्गाला भुरळ घातली आहे. ’सैयारा’च्या यशात आणखी एक खास बाब म्हणजे, रोमँटिक चित्रपटासाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक ओपनिंग वीकेंडचा विक्रम या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे.

अवश्य वाचा : “दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण”? – सुप्रिया सुळे   

सैयाराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती ? (Saiyaara Movie)

सामान्यतः दुसऱ्या आठवड्यात चित्रपटांच्या शोची संख्या कमी होत जाते, मात्र ‘सैयारा’ याला अपवाद ठरला आहे. पहिल्या आठवड्यात २२२५ स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ३८०० स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे, यावरून चित्रपटाचे शो वाढवण्याची मागणी होत असल्याचं दिसून आले आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला देखील ‘सैयारा’ने दमदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी १८५०.५० कोटी, शनिवारी २७ कोटी, अशा एकूण ४५.५० कोटींची कमाई दुसऱ्या आठवड्याच्या केवळ दोन दिवसांत झाली आहे.