Ganga Godavari Maha Aarti : गंगा गोदावरी महाआरतीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती 

Ganga Godavari Maha Aarti : गंगा गोदावरी महाआरतीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती 

0
Ganga Godavari Maha Aarti : गंगा गोदावरी महाआरतीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती 
Ganga Godavari Maha Aarti : गंगा गोदावरी महाआरतीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती 

Ganga Godavari Maha Aarti : कोपरगाव : येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या (Sanjeevani Yuva Pratishthan) वतीने व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीचे (Ganga Godavari Maha Aarti) आयोजन करण्यात आले होते. गंगा गोदामातेचे पूजन करून आरती करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत दर्शन घेतले.

अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास

फटाक्यांची आकाशात लक्षवेधी आतिषबाजी

फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेवांच्या जयघोषात अवघा गोदाकाठ दुमदुमला होता. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बीपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून भगवान शिवशंकर महादेवाचे पूजन केले. नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मन जिंकत असते. यामुळे जागवूया ज्योत माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो. सामाजिक जाणीव जपण्याचे काम सर्व युवासेवकांच्या मेहनतीतून केले जाते ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे.

नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील

लेझर लाईटने गोदावरी तीरी लखलखाट (Ganga Godavari Maha Aarti)

गंगा आरती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी फटाके अवकाशात झेपावत आतिषबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लखलखाट करत होते. गोदतीरी नदीतील पाण्यावर मारलेले रंगीबेरंगी लेझर लाईटने गोदावरी तीरी लखलखाट झाला होता. श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष आकर्षण असणारे भजन आणि देखावे सोहळे आपण आयोजित केले आहे. तरी साधू संतांच्या उपस्थितीत आगामी होणाऱ्या गंगा आरतीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या गंगा गोदावरी आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे परिवार व संजीवनी युवा प्रतिष्ठाण यांच्यावतीने करण्यात आले आहे.


यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, अमृत संजीवनीचे पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक, शिवभक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.