Local Crime Branch : जामखेडमधून नऊ जुगारी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : जामखेडमधून नऊ जुगारी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : जामखेडमधून नऊ जुगारी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : जामखेडमधून नऊ जुगारी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथे भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या (Gambling) क्लबवर छापा टाकून ९ जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे

नितीन आश्रुबा रोखडे (वय ५०,रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड), जावेद इस्माईल बागवान (वय ४४, रा. तपनेश्वर रोड, जामखेड), संतोष नवनाथ कदम (वय ४२,रा. कुसडगाव ता. जामखेड), नवनाथ सदाशिव जाधव (वय ३६,रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), विजय विनायक कळसकर वय ५३, रा. तपनेश्वर रोड, जामखेड), निलेश लक्ष्मण पेचे (वय ४०, रा. पोकळेवस्ती, जामखेड), जयसिंग विश्वनाथ ढोके (वय ४०, रा. भुतवडा, ता. जामखेड), विठ्ठल मोहन भोसले (वय ३८, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), विजय गहिनीनाथ जाधव (वय ५३, रा. कर्जत रोड, जामखेड), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. 

नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील

१ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड शहरात जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकून ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.