Contractor Suicide : नगर : सांगली येथील युवा व उभारते कंत्राटदार हर्षल पाटील (Harshal Patil) यांनी केलेल्या कामाचे देयके न मिळाल्याने त्यांनी नुकतीच आत्महत्या (Contractor Suicide) केली. शासनाच्या (Government) आडमुठेपणामुळे कंत्राटदारांमध्ये नैराश्य आले असून त्यांच्यावर आता आत्महत्येची वेळ आली आहे, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर सेंटरचे अध्यक्ष संजय गुंदेचा यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास
तुटपुंज्या पेमेंट मुळे ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत
जिल्हातील कंत्राटदारांचे शासनाकडे १ हजार २३१ कोटी रुपयांची बिल प्रलंबित आहेत. गेल्या मार्च महिन्यात यातील केवळ ७ टक्केच बिल शासनाने अदा केली आहेत. अशा तुटपुंज्या पेमेंट मुळे जिल्ह्यातील सर्व ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील कंत्राटदारांमध्येही मोठ्या प्रमाणात नैराश्य पसरत आहे. शासनाने त्वरित आमचे प्रलंबित देयके देण्यासाठी तरतूद करावी अन्यथा आम्ही काम बंद ठेऊन तीव्र आंदोल करू, असा इशारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर सेंटरच्या वतीने देण्यात आला, असे ते म्हणाले.
नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील
प्रलंबित बिलांसाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे (Contractor Suicide)
बँकांचे घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असून कामगारांचे पगार करणेही आम्हाला मुश्किल झाले आहे. आमच्या प्रलंबित बिलांसाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली. मात्र, शासनाच्या आडमुठेपणा मुळे यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. सांगली येथील नवोदित युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक बैठकीचे आयोजन करून घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी नगर शाखेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळ संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी अहिल्यानगर सेंटर उपाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन गवारे, कोषाध्यक्ष शिवाजी येवले, रामदास कोल्हापुरे, प्रीतम भंडारी, किरण पागिरे, सचिन भापकर, महेश गायकवाड, पंकज वाघ, श्रीनाथ जिने, योगेश देशपांडे व अमित तोरडमल आदी उपस्थित होते.