
State Excise Department : नगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) अवैध दारू विक्रीविरोधात (Illegal Liquor Sale) मोठी मोहीम राबवत गेल्या सहा महिन्यांत जोरदार कारवाई केली आहे. या कालावधीत विभागाने एकूण ८९५ गुन्हे दाखल केले असून, अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई जिल्ह्यातील विविध तालुक्यात करण्यात आली असून, दारूबंदी क्षेत्रात चालणारी अवैध विक्री, घराबाहेर तयार होणारी गावठी दारू, आणि परराज्यातून आणली जाणारी देशी-विदेशी मद्यसाठा (Domestic and Foreign Liquor Stock) हे कारवाईचे प्रमुख केंद्र ठरले आहेत. या मोहिमेंतर्गत गावठी/देशी दारू जप्त करण्यात आली असून, त्याची बाजारमूल्ये सुमारे १ कोटी १४ लाख ६४ हजार ६२१ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते. तसेच, काही ठिकाणी कारवाई दरम्यान दारू तयार करणाऱ्या यंत्रणा, रसायने व साहित्य देखील हस्तगत करण्यात आले.
अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास
विभागाची सातत्यपूर्ण गस्त आणि तपासणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात पथकाच्या वतीने सातत्यपूर्ण गस्त घातली जात आहे. त्यामुळे चोरटी होणारी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शासनाचा कर चुकवून हॉटेल, वाईन्स शॉप, तसेच ढाब्यांवर अवैध दारू विक्री होत असते. अशा हॉटेल तसेच परमिट बारचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, संगमनेर आदी तालुक्यात कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील
दारूबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई (State Excise Department)
गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात २३० गुन्हे दाखल करून २५६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ९१ हजार २५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. “दारूबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या माहितीबाबत तत्काळ कळवावे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.