Eknath Shinde : नगर : जमीन चोरी प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला न्याय मिळाला आहे. ज्याच्यावर अन्याय झालेला असेल त्याला ताबडतोब न्याय देणे ही शिवसेनेची शिकवण आहे. न्याय देण्याच्या भूमिकेत राहून काम करणारे सर्व माझे सहकारी आहेत. लोकांनी जबाबदारीने आम्हाला मंत्री केल आहे. तर आम्ही तितक्याच तत्परतेने काम करणे यात आम्ही धन्यता मानतो. शिवसेना (Shiv Sena) गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्गार काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या हस्ते चिंचोंडी पाटीलच्या (Chichondi Patil) आजींना सातबारा सुपूर्त करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?
जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरण
चिचोंडी पाटील येथील बहुचर्चित ५१ गुंठे जमीन प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला न्याय मिळाला आहे. कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावरील ही जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरण करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःच्या नावावर लावली होती. याविरोधात अनेक वर्षे प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करूनही न्याय मिळत नव्हता. गेल्या महिन्यात कौसाबाई सरोदे आणि कुटुंबीयांनी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शेळ्या-मेंढ्या घेऊन तहसील कार्यालय परिसरात ९ दिवस बेमुदत आंदोलन केले होते. या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती सरपंच शरद पवार यांनी पांडुरंग दातीर यांच्या निदर्शनास आणून दिली, त्यांनी तत्परता दाखवत ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर गृहराज्यमंत्री कदम यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी थेट संपर्क साधून त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार संजय शिंदे यांनी तातडीने कारवाई करत सदर जमिनीचा फेरफार दुरुस्त करून पूर्ववत करण्याचा आदेश दिला. आणि ती जमीन पुन्हा कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करण्यात आली.
नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल
सरोदे कुटुंबाला न्याय मिळाल्याने गावात समाधान (Eknath Shinde)
या संघर्षानंतर सरोदे कुटुंबाला न्याय मिळाल्याने गावात समाधान व्यक्त होत आहे. या लढ्यात स्थानिक पातळीवर अनेकांनी साथ दिली. न्याय मिळाल्यानंतर आजींनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट पांडुरंग दातीर यांनी राज्य मंत्र्यांच्या कानावर घातली, तत्परता दाखवत त्यांनी आजींना मुंबईला मंत्रालय येथे बोलावले व त्यांच्या नावावर झालेला सातबारा उतारा आजीबाईंना सुपूर्त केला. सोमवारी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कौसाबाई सरोदे यांना अधिकृत सातबारा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सरोदे कुटुंबातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गृहराज्यमंत्री कदम यांचा धनगर समाजाच्या परंपरेनुसार घोंगडी, पिवळा फेटा व भंडारा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच शरद पवार, चंद्रकांत पवार, अभिषेक कदम, युवराज हजारे, किरण मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.