Mahadevi Elephant: एका हत्तीणीसाठी अख्खं ‘कोल्हापूर’ रडलं,ती ‘महादेवी’ नेमकी कोण?

0
Mahadevi Elephant:एका हत्तीणीसाठी अख्खं 'कोल्हापूर' रडलं, ती 'महादेवी' नेमकी कोण?
Mahadevi Elephant:एका हत्तीणीसाठी अख्खं 'कोल्हापूर' रडलं, ती 'महादेवी' नेमकी कोण?

नगर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी मठामधील प्रसिद्ध महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा अभयारण्यात (Vanatara Sanctuary) रवाना करण्यात आली. मात्र ही हत्तीण जाताच नांदणी गाव आणि या मठाशी भावनिक नातं असलेल्या तब्बल ७४३ गावांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी रिलायन्स जिओ नेटवर्कवर बहिष्कार घालण्याचा आणि सिम कार्ड दुसऱ्या कंपन्यांकडे पोर्ट करण्याचा निर्धार केला आहे.

नक्की वाचा :  रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?   

महादेवी हत्तीण नेमकी कोण आहे ? (Mahadevi Elephant)

तब्बल १३०० वर्षांचा धार्मिक इतिहास असणाऱ्या कोल्हापूरमधील नांदणी या छोट्याशा गावात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या ७४८ गावांचा हा मठ केंद्रबिंदू आहे. राजा अकबराने या संस्थानाला हत्ती भेट दिल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून या मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. ३५ वर्षापूर्वी अवघ्या ६ वर्षांची असताना महादेवी हत्तीणीला कर्नाटकातील जंगलातून या मठात आणण्यात आले. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने तिने आबालवृद्धांना आपलेसे करून घेतले. नांदणी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण याबरोबरच परिसरातील गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस तरी तिचे हमखास दर्शन व्हायचे. 

नक्की वाचा :  सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  

रोज १० किलोमीटरचा प्रवास, गावच्या बाजारातून मुक्त फेरफटका असल्याने महादेवीचा ग्रामस्थांसोबत एक प्रकारचा लळाच लागला होता.तिला माधुरी असेही नाव मिळाले. तिच्या मार्गावर अनेकजण तिला आवडीचा खाऊ द्यायचे, ‘महादेवी’ कडूनही कृतज्ञतापूर्वक डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद दिला जायचा. मात्र २०१८ मध्ये महादेवीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहूत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. इथूनच महादेवी पेटा या प्राणी संस्थेच्या नजरेत आली. या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी हत्तीणीचे संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ‘वनतारा’ या गुजरातमधील अंबानी कुटुंबियांच्या खाजगी प्राणी संग्रहालयानेही पेटाची साथ दिली. 

महादेवीला गुजरात मधील वनतारा संग्रहालयात पाठविण्याचे आदेश  (Mahadevi Elephant)

मठात महादेवी हत्तीणीचे संगोपन होत नाही, आजारी काळात तिच्याकडे लक्ष दिले जात नाही, मठातील भट्टारक स्वामींना आपटून मारल्याचे तक्रार देखील या याचिकेत देण्यात आली होती. याशिवाय मठावर वनविभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला. याच याचिकेवर उच्च न्यायालयाने महिनाभरापूर्वी महादेवीला गुजरात मधील वनतारा संग्रहालयात पाठविण्याचे आदेश दिले. या याचिकेला ग्रामस्थांनी आव्हान देखील दिले मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत गावकऱ्यांना धक्का दिला आहे.