IND vs ENG:टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी सज्ज;कसोटी कोण जिंकणार?

0
IND vs ENG:टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी सज्ज;कसोटी कोण जिंकणार?
IND vs ENG:टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी सज्ज;कसोटी कोण जिंकणार?

नगर : टीम इंडिया इंग्लंड विरुद्धचा (IND vs ENG) कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करेल. इंग्लंड या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत सोडवून किंवा विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी हा सामना म्हणजे करो या मरो ठरणार आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे.

नक्की वाचा : एका हत्तीणीसाठी अख्खं ‘कोल्हापूर’ रडलं, ती ‘महादेवी’ नेमकी कोण ?

केनिंग्सटन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार सामना (IND vs ENG)

अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीतील निर्णायक कसोटी सामना आज ३१ जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना केनिंग्सटन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाणार आहे. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज पदार्पणात फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी आकाशदीपला अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह हा सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. तो जर अंतिम अकरात नसेल, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग किंवा प्रसिध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते.

अवश्य वाचा :  रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?   

बुमराह खेळणार की नाही ? (IND vs ENG)

इंग्लंडने पाचव्या सामन्यासाठी २४ तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. त्यानुसार नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे आणि कोण नाही, हे निश्चित झालं आहे. मात्र भारताच्या प्लेइंग ईलेव्हनबाबत सस्पेन्स कायम आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? हे अजूनही नक्की नाही. भारताला सामना जिंकायचा असेल तर बुमराह असणं गरजेचं आहे. त्यामुळे बुमराह असणार की नसणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.