Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

0
Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump Tariff On India : नगर : अमेरिका आणि भारत (America and India) यांच्यात एक व्यापार करार झाला आहे. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर (Donald Trump Tariff On India) लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय व्यापाराला मोठा आर्थिक फटका (Economic Impact) बसणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली माहिती

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबद्दल माहिती दिली आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २२.८ टक्क्यांनी वाढून २५.५१ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर, आयात ११.६८ टक्क्यांनी वाढून १२.८६ अब्ज डॉलर्स झाली आहे.

Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

रशियाकडून लष्करी साहित्य खरेदीमुळे नाराज (Donald Trump Tariff On India)

भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसंच, त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलं आहे.

Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Donald Trump Tariff On India : अमेरिका भारतावर लादणार २५% कर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही, त्यामुळे भारताला एक ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसंच वरील कारणासाठी दंड आकारला जाईल, याकडं लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.