नगर : ज्या कुटुबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे,अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू (Ladki Bahin Yojana) केली आहे. मात्र या निकषांचं उल्लंघन (Violation Of Criteria) करून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे. चक्क सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यावर आता मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवणार,कृषी खातं काढून घेतलं जाणार
काय म्हणाल्या आदिती तटकरे ? (Ladki Bahin Yojana)
ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घेतले, तसेच मिळालेला लाभ पुन्हा दिला आहे. अजूनही अशा महिला ज्या सरकारी नोकरीमध्ये असून देखील या योजनेचा लाभ घेतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, त्यांच्याकडून घेतलेला लाभ हा वसूल केला जाणार आहे, अशी घोषणा यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
अवश्य वाचा : ‘पालतू फालतू’ मध्ये सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक;‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं
लाडकी बहीण योजना पुढेही चालू राहणार (Ladki Bahin Yojana)
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज्य शासनाने ही योजना आणली, याचे नियम आणि निकष सुरुवातीपासून स्पष्ट केलेले आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्या या योजनेपासून केव्हाही वंचित राहणार नाहीत, मात्र ज्या महिला चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे,त्यांच्यावर शासन योग्य ती कारवाई करणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेवर सर्वांचं लक्ष आहे,असं तटकरे यांनी म्हटलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवण्याचा आमचा उद्देश असून ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असंही यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.