Crime filed : नगर : अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे (Taluka police station) हद्दीत कामरगाव शिवारात काल (ता. ३१) रात्री १० च्या सुमारास जुन्या वादातून एका जणावर चारचाकीतून आलेल्या टोळक्याने जीवघेणा हल्ला (Life-threatening attack) केल्याची घटना घडली आहे. याबाबत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) मध्ये कैद झाली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
अझिझ गुलाब सय्यद, अन्वर गुलाब सय्यद, गुलाब फकीर मोहम्मद सय्यद आणि इतर १० ते १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी अन्सार शेख यांनी फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट
सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर (Crime filed)
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी अन्सार शेख यांना कोयते, गज आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अन्सार शेख गंभीर जखमी झाले आहेत. तक्रारदार हे रात्री उशिरा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी कारमधून उतरून थेट हल्ला केला. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.