Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 

Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 

0
Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 
Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 

Fake Notes : नगर : अहिल्यानगर तालुका पोलिसांनी (Taluka police station) बनावट चलनी नोटांच्या (Fake currency notes) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकाडून ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा (Fake Notes), तसेच छपाई व इतर साहित्य असा एकूण तब्बल दोन कोटी १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत नऊ आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत आंबिलवाडी शिवारात एका चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तीकडून पान टपरीवर बनावट चलनी नोटा देऊन खरेदी केले जात आहे. अशी खात्रीशीर माहिती अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कुंभळी, ता. कर्जत), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) या दोन संशियत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची त्यांनी प्रदीप संजय कापरे (वय, २८, रा. तींतरवानी, ता. शिरूर कासार, बीड), विनोद दामोधर अरबट (वय.५३ रा. सातारा परिसर, संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७, रा.पेठेनगर, ता छत्रपती संभाजीनगर), अनिल सुधाकर पवार (वय ३४, रा. मुकुंदनगर, जि. छत्रपती संभाजीनगर), अंबादास रामभाऊ ससाणे रा. शहर टाकळी, शेवगाव), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 
Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 

अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट

आरोपी बीड, छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक (Fake Notes)

आरोपींकडून ५९ लाख ५० हजारांचा बनावट तयार केलेल्या नोटा. या आरोपीना बीड, छत्रपती संभाजीनगर या परिसरातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोलीस अंमलदार सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग, आदिनाथ शिरसाठ, अन्सार शेख, मोहिनी कर्डक, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई 
Fake Notes : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तालुका पोलिसांची कारवाई