Narendra Firodia : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आयएम सुयोग वाघ चा सन्मान

Narendra Firodia : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आयएम सुयोग वाघ चा सन्मान.

0
Narendra Firodia : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आयएम सुयोग वाघ चा सन्मान.
Narendra Firodia : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आयएम सुयोग वाघ चा सन्मान.

Narendra Firodia : नगर : बुद्धिबळ खेळाडू सुयोग वाघने (Suyog Wagh) नुकतेच आयएम टायटल पूर्ण केले असून तो अहिल्यानगर जिल्ह्याचा तिसरा आयएम ठरला आहे. या त्याच्या अद्वितीय कामगिरी मुळे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे (Ahilyanagar District Chess Circle) अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नगर येथे झालेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत प्रशांत धंगेकर, मनीष जसवानी व देवेंद्र ढोकळे हे राष्ट्रीय पंच झाले. त्यांचा सुद्धा सत्कार या वेळी करण्यात आला यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, डॉ. स्मिता वाघ, डॉ. संजय वाघ, प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, विशाल गुजराथी, दत्ता घाडगे, स्वप्निल भागूरकर आदी बुद्धिबळ प्रेमी, खेळाडू, पालक व कोचेस याप्रसंगी उपस्थित होत.

नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष

सचिव यशवंत बापट यांनी केले सर्वांचे स्वागत

आपल्या प्रास्ताविकात अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सर्वांचे स्वागत केले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन जे सहकार्य करत आहे त्यामुळे अहिल्यानगर मधील खेळाडू निरनिराळे विक्रम करत असल्याचे सांगितले.

अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट

नरेंद्र फिरोदिया यांचे मानले आभार (Narendra Firodia)

आपल्या सत्काराला उत्तर देताना सुयोग वाघ ने सांगितले की मला जे अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने सहकार्य केले त्यामुळे मी अहिल्यानगर चा तिसरा आय एम होऊ शकलो. त्याने विशेष अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे आभार मानले. त्यांनी जे कोचिंग कॅम्प नगर येथे भरवले व मला बाहेरगावी कोचिंग दिली त्यामुळे माझा हा प्रवास आनंददायी झाला. नुकतेच सीनियर नॅशनल ऑर्बिटर झालेले मनीष जसवानी, प्रशांत गांगेकर व देवेंद्र ढोकळे यांनी शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे आभार मानून पुढे असेच सहकार्य करावे अशी विनंती केली.


आपल्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की अहिल्यानगर मध्ये लवकरच आम्ही जीएम चा कोचिंग कॅम्प भरवणार असून त्यात विविध खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहोत. तसेच दिवाळीनंतर क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. शांतीकुमार जी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन अहिल्यानगर मधील बुद्धिबळ खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे त्यांनी पुन्हा सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.