Balasaheb Thorat : संगमनेर : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विविध संत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्मांध वृत्ती आजही कार्यरत आहे. हे लोक वेळीच ओळखा गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे (Constitution) असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Sahitya Ratna Annabhau Sathe) यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
विविध मान्यवर उपस्थित
संगमनेर बस स्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने १०५ व्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्ञानेश्वर राक्षे, विश्वासराव मुर्तडक, अमर कातारी, प्रमिला अभंग, प्रा. बाबा खरात,राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, संदीप आव्हाड, संजय जमदाडे, बाबासाहेब साळवे, बापू लहूनडे, गणेश बलसाने, शिवाजी आव्हाड ,मनीष राक्षे, वेदांत राक्षे, राजेंद्र राक्षे, विकी पवार, देवेंद्र साळवे, सचिन शेलार, विनोद साळवे, शुभम आव्हाड, किशोर आव्हाड, संतोष गायकवाड, विश्वनाथ आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, डिके जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट
याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले, (Balasaheb Thorat)
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांची मोठे योगदान राहिले आहे. अनेक हुतात्म्यांनी योगदान देऊन मुंबई मिळवली. मात्र, अनेक उद्योग राज्याबाहेर जात असताना मुंबई बाहेर जाते की काय, अशी भीती सुद्धा सध्या निर्माण झाली आहे. सर्व संतांचे विचार हे राज्यघटनेमध्ये आहे. ही राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे. राजकारण हे अपरिहार्य आहे. परंतु प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण कोणत्या विचारांच्या बाजूने आहोत. बहुजनांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेच्या बाजूने प्रत्येकाने राहिले पाहिजे. राज्यघटनेवर सध्या मोठे आघात होत असून या विरुद्ध सर्वांनी संघटनेतून आवाज उठवावा. याचबरोबर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, ही मागणी आपली असून या समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांनी पहिले शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करावे आणि शिक्षणाची ही चळवळ अधिक समृद्ध करून गोरगरिबांच्या जीवनात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा घेऊन आनंद निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संत, समाज सुधारक आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजे. त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला त्या समतेकरता आज पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे. लोकशाहीची दररोज पायमल्ली होत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, नितीन अभंग, राजेश वाकचौरे पप्पू कानकाटे आदींसह काँग्रेस व मातंग समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.