Operation Akhal:भारतीय सैन्यदलाची मोठी कारवाई;एक दहशतवादी ठार 

0
Opration Akhal:भारतीय सैन्यदलाची मोठी कारवाई;एक दहशतवादी ठार 
Opration Akhal:भारतीय सैन्यदलाची मोठी कारवाई;एक दहशतवादी ठार 

Operation Akhal : भारतीय सैन्य दलाने (Indian Army) मोठी कारवाई केली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात रात्री सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा (Elimination Of The Terrorist) करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलाने ही माहिती दिली आहे. कुलगाम मधील अखल गावात अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शुक्रवारी (ता.१) सायंकाळी या परिसरात घेराबंदी करत शोध मोहीम राबवली असता चकमक सुरू झाली. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि निमलष्कर दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

नक्की वाचा :  “डोळ्यांत पाणी आलं”;’सैयारा’च्या यशानंतर शाळेने केलेल्या गौरवामुळे अनीत पड्डा भावूक  

भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांना कंठस्नान  (Operation Akhal)

भारतीय सैन्यदलाच्या ‘चिनार कॉर्प्स’ या एक्स हँडलवरून या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. “रात्रभर अधूनमधून गोळीबार सुरू होता.”सैन्यदलाने अतिरेक्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे”,असे चिनार कॉर्प्सने म्हटले आहे.

अवश्य वाचा :  ‘बिन लग्नाची गोष्ट’-नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास;चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 

काश्मीरमध्ये तिसऱ्यांदा गोळीबार (Operation Akhal)

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवाद्यांचा एक मोठा गट असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आमच्या माहितीनुसार, या भागात चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे,असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आठवड्याभरात काश्मीरमध्ये घडलेली ही दुसरी मोठी आणि महिन्याभरातील तिसरी गोळीबाराची घटना आहे. गेल्याच आठवड्यात श्रीनगरच्या बाहेरील डोंगराळ भागात झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते. शुक्रवारी सायंकाळी राबवलेलया मोहिमेला ऑपरेशन अखल असे नाव ‘चिनार कॉर्प्स’ ने दिले आहे.