Tofkhana Police Station : पतसंस्थेच्या नावाखाली ६३ लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा 

Tofkhana Police Station : पतसंस्थेच्या नावाखाली ६३ लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा 

0
Tofkhana Police Station : पतसंस्थेच्या नावाखाली ६३ लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा 
Tofkhana Police Station : पतसंस्थेच्या नावाखाली ६३ लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा 

Tofkhana Police Station : नगर : सावेडीतील (Savedi) दोन पतसंस्थेच्या नावाने सहा व्यक्तींना तब्बल ६३ लाख ८२ हजार रूपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अतुल दत्तात्रय खामकर (वय ३१, रा. गवळीवाडा, भिंगार) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध

विश्वास संपादन करून फसवणूक

संतोष हस्तीमल मावानी (रा. दत्त मंदिराजवळ, सिव्हिल हाडको, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी येथील अतुल खामकर यांचे मारूतीराव मिसळ नावाचे हॉटेल आहे. त्यांची संतोष मावानी याच्याशी ओळख सुमारे १० वर्षांपूर्वी झाली होती. संतोषने सुरुवातीला एका अज्ञात पतसंस्थेच्या माध्यमातून आणि नंतर मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुस्तक देऊन डेली कलेक्शन सुरू केले. संतोष दररोज अतुल यांच्याकडून ५ हजार रूपये गोळा करत होता. त्याने हॉटेल व्यवसायामुळे जमा झालेल्या फाटक्या नोटा सहज बदलून देत अतुल यांचा विश्वास संपादन केला.

अवश्य वाचा : दगडफेक,जाळपोळ; यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

घर सोडून पसार झाल्याचे निदर्शनास (Tofkhana Police Station)

त्यानंतर एका वेळेस संतोषने अतुल यांना सांगितले की, १५ लाखांची ठेव केल्यास चांगला परतावा मिळेल. यावरून अतुल यांनी आपले जमा झालेले ५ लाख आणि एचडीएफसी बँकेतून स्वतःचे आणखी १० लाख युनियन बँकेत असलेल्या संतोष मावानीच्या खात्यावर ऑनलाईन पाठवले. दरम्यान, संतोषने २९ जून रोजी पुस्तक घेऊन तपासून आणतो असे सांगून हॉटेलमधून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो रात्री घर सोडून पसार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.