नगर : रमी राव असलेले माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर आता नवी जबाबदारी देऊन त्यांचे एक प्रकारे प्रमोशनच करण्यात आले आहे. ते कालही कॅबिनेट मंत्री होते,आजही कॅबिनेट मंत्रीच आहेत. फक्त कृषी खात्याऐवजी आता त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. कृषी खात्यात त्यांनी असंवेदनशीलपणा दाखवला, ते स्पोर्ट्समध्येही फार मागे राहतील, असे मला वाटत नाही,अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माणिकराव कोकाटेंवर केली आहे.
नक्की वाचा : भारतीय सैन्यदलाची मोठी कारवाई;एक दहशतवादी ठार
जो व्यक्ती सरकारला भिकारी म्हणतो,तो क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना काय म्हणेल ?(Supriya Sule)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खाते देण्यात आले आहे. ही दोन्ही खाती महत्त्वाची आहेत. अल्पसंख्याकामध्ये मुस्लीम, पारशी, जैन अशा कितीतरी समाजाचा समावेश होतो. जो व्यक्ती शेतकरी आणि सरकारला भिकारी म्हणतो, तो क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना काय म्हणेल याचा काही भरवसा नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अवश्य वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा दिलासा;भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका टळला,नवीन तारीख जाहीर
महाराष्ट्राचे दुर्दैव की त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली (Supriya Sule)
त्या पुढे म्हणाल्या की, कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, मात्र त्यांना बढती दिली. कोकाटेंनीही नैतिक जबाबदारीतून स्वतःचा राजीनामा देऊन बाजूला व्हायला हवे होते. त्यांनी आत्मक्लेष करायला हवा होता, पण महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे की, त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.