Local Crime Branch : दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Local Crime Branch : दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

0
Local Crime Branch : दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
Local Crime Branch : दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Local Crime Branch : नगर : सुपा परिसरात दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेल्या तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून १ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध

गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नावे

श्याम  सुरेश उर्फ पैदास चव्हाण (वय २४, रा. विटेकरवाडी,ता. श्रीगोंदा), विशाल गणेश भोसले (वय २१, रा. बांबुर्डी, ता. पारनेर), एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकड़े अधिक चौकशी केली असता त्यांनी हा श्याम सुरेश चव्हाण याचेकडे अधिक चौकशी केली असता ऋतिक सुरेश चव्हाण (रा. पारगाव, बेलवंडी), प्रशांत दिलीप चव्हाण (रा. लक्ष्मीनगर,ता. कोपरगाव) दोन्ही पसार), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नावे आहेत. 

अवश्य वाचा : दगडफेक,जाळपोळ; यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

१ लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य असे एकूण १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच एका जबरी चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार सुपा परिसरात अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.