BJP : खासदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील प्रश्न सोडवावेत : महेश नामदे

BJP : खासदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील प्रश्न सोडवावेत : महेश नामदे

0
BJP : खासदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील प्रश्न सोडवावेत : महेश नामदे
BJP : खासदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील प्रश्न सोडवावेत : महेश नामदे

BJP : नगर : भिंगार शहराच्या विकासासाठी भाजप (BJP) सरकार समर्थ आहेत. भिंगारला नव्याने नगरपालिका (Bhingar Municipality) करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घोषणेमुळे भिंगारच्या विकासास चालना मिळणार आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी आधी स्वतःच्या पारनेर तालुक्यातील प्रश्न सोडवावेत. भिंगार शहराची त्यांनी काळजी करू नये, असे पत्रक भाजप शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे (Mahesh Namde) यांनी काढले आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध

खासदार लंकेंनी मंत्री गडकरींकडे केली होती उड्डाणपुलाची मागणी

खासदार निलेश लंके यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भिंगार मध्ये उड्डाणपूल करण्याची मागणी केली आहे. त्या अनुसंगाने भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे यांनी पत्रक काढून भिंगारच्या विकासाची जबाबदारी भाजप सरकार सक्षमपणे पार पाडत असल्याचे म्हटले आहे.

अवश्य वाचा : दगडफेक,जाळपोळ; यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

व्यापारावर परिणाम होण्याची वर्तवली शक्यता (BJP)

खासदार निलेश लंके यांनी भिंगार शहरांमध्ये उड्डाणपूल करण्याची मागणी चुकीची आहे. भिंगार शहरात जर उड्डाणपूल झाला तर भिंगारवासीयांचे अतोनात नुकसान होणार आहे. भिंगार शहरातून जाणारा विशाखापट्टणम मुंबई महामार्ग हा भिंगारवासीयांसाठी जीवन वाहिनी आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशांमुळे भिंगारमध्ये मोठ्याप्रमाणात उलाढाल होत आहे. भिंगार शहराला बाहेरील सर्व बाजूंना जोडणारा हा महामार्ग आहे. भिंगार शहरात जर उड्डाणपूल केल्यास सर्व वाहने उड्डाणपणावरून जातील. त्यामुळे भिंगार शहराचा संपर्क तुटून दळणवळण कमी होईल. याचा परिणाम भिंगार शहरातील व्यापारावर, आर्थिक उलाढालीवर होईल. त्यामुळे भिंगार मध्ये उड्डाणपूल न करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी आधी स्वतःच्या पारनेर तालुक्याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.