AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 

AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 

0
AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 
AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 

AMC : नगर : शहरामध्ये एकीकडे विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून या कामासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, दुसरीकडे महापालिका (AMC) प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरातील कचरा संकलनाचे (Garbage Collection) तीन तेरा वाजले असून सर्वत्र रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न (Health Issues) निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध

महापालिकेच्या कारभाराविरोधात संतापाची लाट

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात कचरा संकलन होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे अनेक ठिकाणी शहरात विकासाचे कामे सुरु आहेत. तर दुसरीकडे कचरा पडून असल्याचे चित्र आहे. हा कचरा महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट आहे.

AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 
AMC : महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शहरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया 

अवश्य वाचा : दगडफेक,जाळपोळ; यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

माजी नगरसेवकांकडून स्वखर्चायातून कचरा संकलन (AMC)

महापालिकेने कचरा संकलन करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडून कुठल्याही उपयोजना होताना दिसत नाही. मात्र, काही प्रभागात माजी नगरसेवकांकडून स्वखर्चायातून कचरा संकलन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम माजी नगरसेवक करत असतील तर महापालिका कशाचा कर आकारते अशा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा हा कचरा आयुक्तांच्या दालनात टाकण्यात येईल, असा इशारा ही नागरिकांनी दिला आहे.