Maratha Marriage Code of Conduct:मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?

0
Maratha Marriage Code of Conduct: मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?
Maratha Marriage Code of Conduct: मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?

Maratha Marriage Code of Conduct: लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे. मात्र सध्या या लग्न पद्धतीला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. त्याला कारण म्हणजे लग्नसमारंभातील वाढता दिखावा आणि अवाजवी केला जाणारा खर्च. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजातील (Maratha Community) हुंडा (Dowry) व एकूणच लग्नसमारंभातील वाढता दिखावा (Rising Costs of Weddings) आणि लग्नातील अनाठायी खर्चावर समाजातील लोकांकडूनच बोट ठेवण्यात आलय. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) मराठा समाजाने पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. तसेच लग्नात केला जाणारा खर्च टाळण्यासाठी एक आचारसंहिताच (Code of Conduct) जाहीर केली आहे.

नक्की वाचा : भारतीय सैन्यदलाची मोठी कारवाई;एक दहशतवादी ठार

नगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात राज्यातील पहिले संमेलन (Maratha Marriage Code of Conduct)

अहिल्यानगर शहरातील मराठा समाजातील मान्यवर लोकांनी राज्यात सर्व प्रथम एकत्र येऊन मराठा समाजासाठी लग्नासाठीची एक आचारसंहिता तयार केली होती. याचसंदर्भातील हे पहिले संमेलन नगरच्या कोहिनूर मंगल कार्यालय येथे पार पडलय. आता या संमेलनात मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आचारसंहिता ठरवण्यात आली आहे. ती नेमकी काय आहे ते पाहुयात..

अवश्य वाचा :  “कृषी खात्यात असंवेदनशीलपणा दाखवणारे स्पोर्ट्समध्येही मागे राहणार नाही”- सुप्रिया सुळे 

आचारसंहितेतील प्रमुख मुद्दे: (Maratha Marriage Code of Conduct)

१- लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांत करावा.
२-  प्री-वेडिंग बंद करावे.
३- साखरपुडा हळद व लग्न एकाच दिवशी करण्यात यावे.
४- लग्नात हुंडा घेऊ नये आणि देऊही नये.
५- लग्नात डीजे लावण्या ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवली जावीत व  लोक कलावंतांना संधी द्यावी.
६- कर्ज काढून लग्न करू नयेत.
७- नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
८-  लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच  फेटे बांधावेत.
९-लग्नात सोन्याची वस्तू गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये.
१०- रोख स्वरूपात आहेर देण्याऐवजी पुस्तक द्यावेत.
११- अन्नाची नासाडी थांबवावी भांडी फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी.
१२- मानपान  जाण त्यांनीच करावा.
१३- सामूहिक विवाह ही काळाची गरज समजून त्यासाठी प्रयत्न करावेत.
१४-  लग्नानंतर मुलीच्या संसारात मुलीच्या आईकडून मोबाईलवर होणारा हस्तक्षेप बंद करावा.
१५-सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये.
१६- नव उद्योजक व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एखाद्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांना ऐपतीप्रमाणे रोख रक्कम द्यावी किंवा त्यांच्याकडूनच खरेदी करावी.
१७- लग्न व दशक्रिया विधी प्रसंगी आशीर्वाद आणि श्रद्धांजलीची भाषणे नकोत.
१८. उद्योग आणि आर्थिक साक्षरते साठी समाजप्रबोधन करावे.

 असे अनेक नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आले आहेत. या नियमांमुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या लग्नात ही नियमावली आपल्याला बघायला मिळणार आहे.