Gautami Patil Sakhubai Song: काही दिवसांपासून सोशल मीडियावर सखूबाई कोण ? याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर ही ‘आतली बातमी फुटली’ असून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आहे. नुकतेच तिचे आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली’ (Aatali Batmi Futali Movie) या चित्रपटातील सखूबाई (Sakhubai Song) हे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत.
नक्की वाचा : “डोळ्यांत पाणी आलं”;’सैयारा’च्या यशानंतर शाळेने केलेल्या गौरवामुळे अनीत पड्डा भावूक
‘सखुबाई’ गाण्यात गौतमीचा कातिल अंदाज (Gautami Patil Sakhubai Song)
प्रत्येकाला ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर ऐकायला जितकं जल्लोषमय आहे, तितकंच तो पहायलाही कमाल आहे. ‘सबसे कातिल’ गौतमी पाटील आणि ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चांगलीच धमाल आणली आहे. या धमाकेदार गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायलं आहे.
अवश्य वाचा : ‘बिन लग्नाची गोष्ट’-नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास;चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
१९ सप्टेंबरला चित्रपट राज्यभरात प्रदर्शित (Gautami Patil Sakhubai Song)
‘हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल,असा विश्वास गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधव या दोघांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका असणार आहे. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.