Police : नालेगाव येथील मारहाण प्रकरणी चार आरोपी अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

Police : नालेगाव येथील मारहाण प्रकरणी चार आरोपी अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

0
Police : नालेगाव येथील मारहाण प्रकरणी चार आरोपी अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी
Police : नालेगाव येथील मारहाण प्रकरणी चार आरोपी अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

Police : नगर : पूर्व वैमनस्यातून दिल्ली गेट, दातरंगे मळा परिसरात झालेल्या मारहाण (Beating) प्रकरणी तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) चार आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता तीन दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

प्रशांत दळवी, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, किरण जरे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २४ जुलै रोजी दुपारी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना राहत्या घरात घुसून लाकडी दांडके व धारदार शस्त्रांनी मारहाण केली होती. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी रोहन याचे फिर्यादीवरून पवन पवार, शिवम पवार, आदित्य सकट, आदर्श साळुंखे, प्रशांत दळवी, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, अमोल गोरे, किरण झरे, चेतन निंदाणे, राहुल रोहकले, आयान शेख, यश पवार आणि इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील

सरकारी वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरून हा निर्णय (Police)

याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील कोर्ट क्रमांक २२ चीफ जुडिशियल मॅजिस्ट्रेट दीपाली एन. मेहेत्रे यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत फिर्यादी रोहन जयेंद्र चव्हाण यांच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद तसेच पोलीस आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरून हा निर्णय न्यायालयाने दिला आहे.