Lumpy Skin Disease : जिल्ह्यात १९२ गावात लंपीचा संसर्ग; जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र घोषित

Lumpy Skin Disease : जिल्ह्यात १९२ गावात लंपीचा संसर्ग; जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र घोषित

0
Lumpy Skin Disease : जिल्ह्यात १९२ गावात लंपीचा संसर्ग; जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र घोषित
Lumpy Skin Disease : जिल्ह्यात १९२ गावात लंपीचा संसर्ग; जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र घोषित

Lumpy Skin Disease : नगर : जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा फैलाव (Lumpy Skin Disease) मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने (District Administration) मोठा निर्णय जाहीर केला आहे. फैलाव वाढलेल्या गावांसह संपूर्ण जिल्हा लम्पी (Lumpy) बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे आता लम्पी नियंत्रित क्षेत्र ठरणार असून या ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री, बाजार, शर्यती, वाहतूक यासह सार्वजनिक ठिकाणी जनावरे एकत्र आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

१९२ गावामध्ये लम्पीचा फैलाव

जिल्ह्यात सध्या १९२ गावामध्ये लम्पीचा फैलाव वाढला आहे. तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अहिल्यानगर २, अकोले ४, जामखेड ४, कर्जत २३, कोपरगाव ११, नेवासा ३६, पारनेर १८, पाथर्डी २, राहाता २५, राही १३, संगमनेर ३१, शेवगाव २, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १९. या गावासह दहा किलोमीटर परिसरातील गावे व वाड्यांचाही समावेश त्यात होत आहे.

नक्की वाचा : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार : मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिबंधक उपाययाेजना (Lumpy Skin Disease)

त्यात वाहने व पशुधनासह वाहतूक करण्यास वाहनांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच बाधित भागातील जनावरे यांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंध करण्यात आला असून बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले आहे. बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतूक फवारणी करणे, भटक्या पशुधनाचे नियमित निरिक्षण व बाधित पशुधनापासून काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.