
Attempt to Murder : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील घोसपुरी येथील स्मशानभूमीमध्ये झाडे लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एका तरूणावर हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना घडली आहे. विठ्ठल चंद्रभान हंडोरे (वय ३७, रा. घोसपुरी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान विठ्ठल हंडोरे यांनी दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka police station) स्वामी सर्जेराव चव्हाण (रा. घोसपुरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
दगड, लोखंडी रॉडने पाठीत मारहाण (Attempt to Murder)
ही घटना शनिवारी (ता. २) रोजी घडली. झाडे लागवडीचे काम सुरू असताना स्वामी चव्हाण याने अचानक घटनास्थळी येत सरपंच किरण साळवे व उपसरपंच संतोष खोबरे यांना शिवीगाळ केली. प्रसंगावधान राखून विठ्ठल हंडोरे हे सदर वाद मिटवण्याच्या उद्देशाने तेथे गेले असता, संशयित आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. हंडोरे यांच्या डोक्यात दगड मारून, लोखंडी रॉडने पाठीत मारहाण करत गळा दाबून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.