Water Supply : नगर : महावितरण (Mahavitaran) वीज वितरण कंपनीकडून मंगळवारी (ता. १२) त्यांच्या महत्वाच्या कामांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या (Ahilyanagar City) मध्यवर्ती भागासह उपनगराला एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा (Water Supply) होणार आहे. शहराचा पाणी पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत विस्कळीत राहणार आहे.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!
मुळा डॅम विद्युत वाहिनीवर ११ ते ५ पर्यंत शट डाउन
महावितरण कंपनीकडून वृक्षांच्या फांद्या तोडणे तसेच बाकीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करण्यासाठी ३३ के.व्ही. मुळा डॅम विद्युत वाहिनीवर मंगळवारी (ता. १२) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच या शटडाउन वेळेत अहिल्यानगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान काळात मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
अवश्य वाचा : कबुतरखान्याचा वाद नेमका काय? जैन समाजाचा या वादाशी काय संबंध ?
या भागाला बुधवारी पाणीपुरवठा (Water Supply)
त्यामुळे मंगळवारी (ता. १२) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायक नगर, आगरकर मळा, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागाला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागाला बुधवारी (ता. १३) पाणीपुरवठा करण्यात येईल.
बुधवारी (ता. १३) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, बुरुडगांव रोड, सारसनगर इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवारी (ता. १४) करण्यात येईल.
गुरुवारी (ता. १४) पाणी पुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी आदी भागात महापालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणी पुरवठा हा गुरुवार ऐवजी शुक्रवारी (ता. १५) करण्यात येईल. शहरातील पाणी पुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणी पुरवठा करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.