Dhananjay Munde : मुंडे साहेबांना संघर्ष पाचवीला पुजलेला होता, तसा आमच्या कुटुंबालाच संघर्ष पाचवीला पुजलेला असल्याचं धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते लातूर येथे स्व.गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंडे बंधु-भगिनींसह राज्याचे २ मंत्री आणि अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. येथील कार्यक्रमात मुंडे बंधु-भगिनींनी तुफान फटकेबाजी केली. माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडेंचा संघर्ष सांगितला. तसेच आमच्या परळी मतदारसंघाकडे लक्ष द्यावे,अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांना केली.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव (Dhananjay Munde)
मुंडे साहेबांना संघर्ष पाचवीला पूजलेला, तसाच आमच्या कुटुंबाच्या वाटेलाही संघर्ष पूजलेला आहे, पण मी सावलीसारखं, अगदी पहिल्या संघर्ष यात्रेपासूनचा हा संघर्ष पाहिलेला आहे, असे म्हणत आमदार धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. गोपीनाथ मुंडेंनी फक्त आणि फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठीच तो संघर्ष केला. ज्यावेळी २०११ साली भाजपमध्ये भाजप अध्यक्ष व्हायचा होता, त्यावेळी मुंडे साहेबांनी पहिलं नाव घेतलं ते देवेंद्र फडणवीस यांचं घेतलं. उभा महाराष्ट्र त्यांनी संघटना बांधणीसाठी काम केलं. कर्तृत्ववान कार्यकर्ता हा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षावही केली.
अवश्य वाचा : ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना
मुंडेसाहेब मुख्यमंत्री व्हावं अशी आपली सर्वांची इच्छा होती’ -धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मुंडेसाहेब मुख्यमंत्री व्हावं अशी आपली सर्वांची इच्छा होती,पण दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर गेले. मात्र,त्यांचा आशीर्वाद असलेले देवेंद्र फडणवीस हे एकवेळा नाही तीनदा मुख्यमंत्री झाले. परळी मतदार संघ बाजूलाच आहेत, तिकडं देखील आपण लक्ष द्यावं. तुम्ही आहात, बाजूला पंकजा ताई, जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले आहेत तुमचे मन राजासारखे आहे. तुमच्या शिवाय वाड्या-वस्त्यांचा विकास होऊ शकणार नाही, असे म्हणत परळी मतदारसंघाकडे लक्ष देण्याची मागणी धनंजय मुंडेंनी मंचावरील सर्वच मंत्र्यांना केली. तसेच, तुम्हा-आम्हा सर्वांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे, असेही मुंडेंनी म्हटले.