Nilesh Lanke : वंदे भारत, नगर-पुणे रेल्वेसाठी रेल्वेमंत्री सकारात्मक : खासदार नीलेश लंके

पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेची मागणी (Nilesh Lanke)

0
पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेची मागणी (Nilesh Lanke)
पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेची मागणी (Nilesh Lanke)

Nilesh Lanke : नगर : नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीस (Vande Bharat Express) अहिल्यानगर येथे थांबा असावा यासाठी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यास त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याचे सांगतानाच पुणे ते नगर व नगर ते छत्रपती संभाजीनगर या नव्या रेल्वेमार्गासाठीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या मार्गाचा डीपीआर देखील मंजुर झाला असल्याचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!

नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खा.नीलेश लंके यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना खा. लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी पद्सिंह जाधव, विकास कुमार, शंतणू आत्रे, स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन, शुभम थोरात, बेनीप्रसाद मीना, अभय आगरकर, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : कबुतरखान्याचा वाद नेमका काय? जैन समाजाचा या वादाशी काय संबंध ?

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले,

नगरकरांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीय क्षण आहे. नागपूर ते पुणे या ८८१ किलोमीटरच्या प्रवासात ही गाडी १२ ठिकाणी थांबणार असून त्यात अहिल्यानगर स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे मंत्र्यांनी या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या राजकीय आयुष्यात असे कार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिले नाहीत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण रेल्वेमंत्र्यांकडून संभाजीनगर ते अहिल्यानगर व अहिल्यानगर ते पुणे अशी औद्योगिकरण, धार्मिक स्थळांचा विचार करून रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीलाही रेल्वेमंत्रयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या मार्गाचा डीपीआर देखील मंजूर झाल्याचे खा. लंके म्हणाले.

पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेची मागणी (Nilesh Lanke)

खा लंके पुढे म्हणाले, पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेचीही आपण मागणी केली आहे. इंटरसिटी सुरू झाल्यानंतर नगरला वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. पुण्यात काम करणारा नगरचा माणूस दररोज या गाडीने प्रवास करून वेळेत पोहचू शकतो असेही त्यांनी सांगितले.

राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती झाल्यानंतर प्रथमच आम्ही एका व्यासपीठावर एकत्र आलो. विधानपरिषदेचे सभापती म्हटल्यावर आपला भेटीसाठी कधी नंबर लागणार असा प्रश्न होता. परंतू योगायोगाने भेट झाली, ती देखील स्टेशनवर झाल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हास्य पसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here