Help for Treatment : स्नेहमेळाव्याची ५० हजार रुपयांची रक्कम दिली मित्राच्या उपचारासाठी

Help for Treatment : स्नेहमेळाव्याची ५० हजार रुपयांची रक्कम दिली मित्राच्या उपचारासाठी

0
Help for Treatment : स्नेहमेळाव्याची ५० हजार रुपयांची रक्कम दिली मित्राच्या उपचारासाठी
Help for Treatment : स्नेहमेळाव्याची ५० हजार रुपयांची रक्कम दिली मित्राच्या उपचारासाठी

Help for Treatment : अकोले : आपल्या वर्गमित्राला कर्करोगाने गाठले आहे, त्याला मदतीची (Financial Help) गरज आहे, ही बातमी कळल्यावर माजी विद्यार्थ्यांनी (Alumni) स्नेहमेळाव्यासाठी आयोजित केलेले ५० हजार रुपयांची रक्कम तत्काळ मदत (Help for Treatment) म्हणून पाठवली. हा आदर्श निमज (ता. संगमनेर) येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उभा केला आहे.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!

उदरनिर्वाहासाठी शेतात मोलमजुरीचे काम

धामणगाव पाट (ता. अकोले) येथील ठाकर समाजाचे निवृत्ती जयराम पारधी यांचे कुटुंब फारशी शेती नसल्याने रोजगाराच्या शोधात निमज येथे आले. संगमनेर शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे यांच्या शेतात मोलमजुरी करता-करता वाट्याने शेती करण्यास सुरुवात केली. मुळातच हे कष्टाळू कुटुंब, प्रामाणिकपणे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. नंतर संदीप सहादू कासार यांचे शेतात काम केले. त्यांचा मुलगा नितीनचे दहावीपर्यंतचे शिक्षण भारतरत्न राजीव गांधी विद्यालय येथे झाले.

अवश्य वाचा : कबुतरखान्याचा वाद नेमका काय? जैन समाजाचा या वादाशी काय संबंध ?

अन्न, पाणी गिळण्यास त्रास (Help for Treatment)

अत्यंत शांत व संयमी विद्यार्थी म्हणून विद्यालयात ओळखला जात होता. अनेक वर्षांनंतर हे कुटुंब आपल्या मूळ गावी धामणगाव पाटला गेले आणि तेथेही शेतीत मोलमजुरी करु लागले. साधारण तीन महिन्यांपूर्वी नितीनला अन्न, पाणी गिळण्यास त्रास सुरु झाला. स्थानिक उपचार केले पण फरक पडला नाही म्हणून संगमनेर येथील खासगी दवाखान्यात तपासण्या करुन उपचार केले. परंतु, नंतर त्याला बोलणे कठीण झाले, थोड्या काळात आवाज बंद झाला. मोठे संकट कुटुंबापुढे निर्माण झाले. काहींच्या सल्ल्याने नाशिक येथील खासगी रुग्णालयात तपासणी केली असता घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हा कुटुंब हवालदिल झाले. आर्थिक परिस्थिती नाजूक होती. कुटुंबाने घरातील अन्नधान्य विकून उपचार सुरु केले. दर आठवड्यास केमोथेरपीसाठी पाच हजार रुपये खर्च सुरु झाला. आता त्याला द्रव स्वरूपात अन्न दिले जात आहे.


नितीनला कर्करोग झाल्याचे काही वर्ग मित्र-मैत्रिणींना समजले. २०१० च्या सर्व मित्रमैत्रिनींनी स्नेहमेळावा घेण्याचे निश्चित केले होते आणि त्याच दरम्यान नितीनच्या आजाराबाबत त्यांना समजले. त्यांनी एकमेकांशी संपर्क करुन सर्वांना अवगत केले. त्यानंतर स्नेहमेळाव्यासाठी जमा केलेली रक्कम नितीनला उपचारासाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. आज धामणगाव पाट येथे जाऊन पारधी कुटुंबांची भेट घेऊन ५० हजार रुपये कुटुंबाकडे सुपुर्द केली. त्यांनी नितीनच्या घरी जाऊन त्याच्या चेहर्‍यावर हसू बघून चांगले कर्म केल्याचा आनंद घेतला. भारतरत्न राजीव गांधी विद्यालयातील मित्रांनी इतरांसमोर हा आदर्श ठेवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.