Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकर यांची सून

Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकरची सून

0
Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकरची सून
Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकरची सून

Sachin Tendulkar : नगर : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचा व्यावसायिक कुटुंबातील सानिया चांडोकचा सोबत साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सानिया चांडोक (Sania Chandok) ही देशातील मोठे उद्योगपती रवी घई यांची नात असल्याचे समोर येत आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित

उदयोन्मुख क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबत एक नवीन इनिंग सुरू केली पण, अद्याप दोघांचं साखरपुड्याचे फोटोज समोर आलेले नाही. अर्जुन आणि सानिया चांडोकचा अतिशय खाजगी समारंभात साखरपुडा झाला असून दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक या साखरपुड्याला उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकरची सून
Sachin Tendulkar : कोट्याधीश सानिया बनणार सचिन तेंडुलकरची सून

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

सानिया आणि अर्जुन बालपणीचे मित्र (Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकरची भावी-सून सानिया आणि अर्जुन बालपणीचे मित्र आहेत. सानिया देशातील एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील असून तिचे वडील सचिनचे चांगले मित्र आहेत. सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि मायदेशी परतल्यानंतर सानियाने कौटुंबिक बिझनेसमध्ये हातभार लावायला सुरुवात केली. चित्रपटांशी संबंधित असूनही सानियाने कौटुंबिक व्यवसाय निवडला आणि स्वतःची ओळख निर्माण केली. सानियाची सारा तेंडुलकरशी मैत्री असून सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही आणि प्रसिध्दी झोतापासून दूर राहायला आवडते. कौटुंबिक व्यवसायाव्यतिरिक्त सानियाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर LLP ची संस्थापक आहे. सानियाचे स्टार्टअप पाळीव प्राण्यांसाठी प्रीमियम स्किनकेअर आणि स्पा सेवा प्रदान करते.