Subroto Mukherjee Football Cup : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी, पुणे संघ अजिक्य तर कोल्हापूर संघ उपविजेता

Subroto Mukherjee Football Cup : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी, पुणे संघ अजिक्य तर कोल्हापूर संघ उपविजेता

0
Subroto Mukherjee Football Cup : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी, पुणे संघ अजिक्य तर कोल्हापूर संघ उपविजेता
Subroto Mukherjee Football Cup : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी, पुणे संघ अजिक्य तर कोल्हापूर संघ उपविजेता

Subroto Mukherjee Football Cup : नगर : जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या (Pravara Rural Education Society) प्रवरा स्पोर्ट अकॅडमी तसेच प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षे मुली राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ (Subroto Mukherjee Football Cup) स्पर्धेत क्रिडा प्रबोधनी, पुणे संघाने बाजी मारत कोल्हापूर संघाचा पराभव करुन राज्य अजिंक्यपद पटकावले. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधनी पुणे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

पेनल्टीवर क्रीडा प्रबोधनी पुणेचा ३-० ने रोमांचक विजय

अंतीम स्पर्धेत कोल्हापूर विभाग विरुद्ध क्रीडा प्रबोधनी पुणे यांनी पेनल्टीवर क्रीडा प्रबोधनी ३-० ने रोमांचक विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले. तर तृतीय क्रमांक सामना, पुणे विभागाने नागपूर विभागावर मात करून तिसरे स्थान मिळवले.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित (Subroto Mukherjee Football Cup)

स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा कार्यालयातील भाऊराव वीर, महेंद्र डांगे, विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए . पवार, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या विद्या घोरपडे, संस्थेचे क्रीडा अधिकारी डॉ. उत्तम अनाप आदींसह संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये नागपूर अमरावती लातूर छत्रपती संभाजी नगर नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर व क्रीडा प्रबोधनी अशा नऊ संघातील १४४ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेकरिता अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनवणे अभय साळवे अतुल डे विल्यम राज जिरेमिया लूमट्राऊ यांनी काम पाहिले आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून प्रवरेच्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरती खेळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढे जावे याचे प्रत्यक्ष ज्ञान या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी पार पाडत असतांना विद्यार्थ्यांनी खेळातही चांगले करिअर करावेत आणि यातून राज्य आणि देश पातळीवरती पोहचण्यासाठी यासाठी प्रवरा स्पोर्टस अकॅडमी कायमच आपल्या सोबत राहील असे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले सहभागी सर्व संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघ आता महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे आता दिल्ली जिंका अशा शुभेच्छा देत असतानाच प्रवरेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या सुविधा खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण अशाच ठरल्या. खेळातून शरीर आणि मन निरोगी राहते, आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोडगे यांनी तर आभार प्राचार्य विद्या घोरपडे यांनी मानले.