Mudslinging : रस्ता मिळत नसल्याने महिला सरपंचाच्या वाहनावर चिखलफेक! 

Mudslinging : रस्ता मिळत नसल्याने महिला सरपंचाच्या वाहनावर चिखलफेक! 

0
Mudslinging : रस्ता मिळत नसल्याने महिला सरपंचाच्या वाहनावर चिखलफेक! 
Mudslinging : रस्ता मिळत नसल्याने महिला सरपंचाच्या वाहनावर चिखलफेक! 

Mudslinging : शेवगाव : तालुक्यातील नवीन दहिफळ (Navin Dahifal) गावच्या महिला सरपंच सविता शिंदे यांच्या चार चाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता मिळत नसल्याने चिखल फेक (Mudslinging) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दडपण्याचा प्रयत्न महिला सरपंचाकडून करण्यात आला होता, मात्र सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

सर्वांच्या भेटी घेऊन केला पत्रव्यवहार

नवीन दहिफळ गावांतर्गत नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी हा जो शिव रस्ता आहे, तो मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. ५० वर्षानंतरही या गावाला शिवरस्ता मिळत नसल्या कारणाने शालेय विद्यार्थ्यांचे पावसाळ्यामध्ये खूप हाल होत आहेत, सरपंच सविता शिंदे यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी याबाबत शेवगाव पाथर्डीच्या आमदार, अहिल्यानगरचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या पदरात निराशाच पडली.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

विद्यार्थ्यांना आपला राग झाला अनावर (Mudslinging)

गेल्या काही दिवसांपूर्वी महिला सरपंच सविता शिंदे व त्यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घडवू असा शब्द दिला होता. परंतु तोही पूर्ण झाला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला राग अनावर झाला व त्यांनी सरपंचाची गाडी अडवून त्यांना याबाबत जाब विचारत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचं बोलले जातय.या घटनेमुळे महिला सरपंच व तिच्या पतीला राजकीय व्यवस्थेचे कसे बळी बनले हे समोर आले आहे.