BJP : कर्जत शहरात भाजप आणि मित्रपक्षाच्यावतीने तिरंगा पदयात्रा

BJP : कर्जत शहरात भाजप आणि मित्रपक्षाच्यावतीने तिरंगा पदयात्रा

0
BJP : कर्जत शहरात भाजप आणि मित्रपक्षाच्यावतीने तिरंगा पदयात्रा
BJP : कर्जत शहरात भाजप आणि मित्रपक्षाच्यावतीने तिरंगा पदयात्रा

BJP : कर्जत : येथे भाजप (BJP), मित्रपक्ष, सर्व विद्यालये व पत्रकार संघटनेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिम्मित (Indian Independence Day) तिरंगा पदयात्रा गुरुवारी (ता.१४) सकाळी काढण्यात आली. ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज मंदिरापासून सुरू झालेली तिरंगा पदयात्रा शहरातून निघत बाजारतळ येथे समारोप करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. शेवटी राष्ट्रगीताने (National Anthem) तिरंगा पदयात्रेचा समारोप झाला.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

सैन्याच्या शौर्य आणि बलिदानास वंदन

७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी यासह ऑपरेशन सिंदूर विजयाच्या भारतीय सैन्य दलाच्या साहस, शौर्य आणि बलिदानास वंदन आणि नमन करण्यासाठी कर्जत भाजपाच्यावतीने महायुतीचे सर्व घटक पक्ष यासह शहरातील सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधव आणि समस्त कर्जत ग्रामस्थांच्यावतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज मंदिरापासून तिरंगा पदयात्रेची सुरुवात झाली. मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्जत बसस्थानक, छत्रपती संभाजी महाराज चौक, क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक, जुनी पंचायत समिती रोड, म्हसोबा गेट ते कर्जत बाजारतळ येथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पदयात्रेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (BJP)

यावेळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, प्रवीण घुले, शांतीलाल कोपनर, उपसभापती अभय पाटील, सचिन घुले, संचालक श्रीहर्ष शेवाळे, सुनील शेलार, लाला शेळके, चिंतामण मुरकुटे, देविदास आबा खरात, सचिन पोटरे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, भाऊसाहेब तोरडमल, काका धांडे, रवी सुपेकर, ओंकार तोटे, दत्तात्रय मुळे, गणेश क्षीरसागर, नंदलाल काळदाते, गणेश काळदाते, दत्तात्रय नलावडे, नीलकंठ शेळके, आण्णा मेहेत्रे, सुनील यादव, बंटी यादव, स्वप्नील तोरडमल, गणेश पालवे, यशराज बोरा, रोहित ढेरे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी सरपंच विजय तोरडमल, भाजपा युवा मोर्चाचे विनोद दळवी, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उमेश जपे, संतोष निंबाळकर, रुद्र भिसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.