Local Crime Branch : नगर : संगमनेर तालुक्यात महिला साथीदारांच्या मदतीने दिवसा घरफोडी (Burglary) करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव
सोपान भाऊसाहेब काळे (वय २०, लेखमापुरी, ता.शेवगाव, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल भाऊसाहेब काळे, देविका अग्नेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात दिवसा घरफोडी करणारी टोळी ही काळे आणि त्याच्या साथीदारांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस शेवगाव येथून ताब्यात घेतले. या टोळीने नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आदी ठिकाणी चोरी, घरफोडी, खून असे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, सारिका दरेकर, ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली.