Radhakrishna Vikhe Patil : मतदारा याद्यांबाबत राहुल गांधींकडून दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न; मंत्री विखे पाटील यांचा आरोप

Radhakrishna Vikhe Patil : मतदारा याद्यांबाबत राहुल गांधींकडून दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न; मंत्री विखे पाटील यांचा आरोप

0

Radhakrishna Vikhe Patil : नगर : सध्‍या देशामध्‍ये केवळ मतदारा याद्यांचे कारण पुढे करुन, कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) शंका उपस्थित करुन, ज्‍यांनी सैनिकांच्या कर्तबगारीवरच संशय निर्माण केला तेच राहुल गांधी आता मतदारांना खोटे ठरविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. मात्र, मतदार याद्यांची संपूर्ण प्रक्रिया आयोगाकडून पार पाडली जाते. प्रारुप याद्या जाहीर झाल्‍यानंतर तुम्‍ही हरकती का? नाही नोंदविल्‍या, असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहीते, उत्तरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका (Radhakrishna Vikhe Patil)

विरोधी पक्षाच्‍या आरोपांना जनतेच्‍या मनात कुठेही जागा नाही, मात्र महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी आता या आरोपांना वेळीच उत्तर दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच हिंदूत्वाचा विचारच भारताला बलशाली बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील अवैध धंदे आणि अतिक्रमणाबाबत पोलीस प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आहेत. आगामी काळात अतिक्रमणाची मोहीम पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या असल्याने त्याची तयारी सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.