Ram Shinde : पाथर्डी : विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे शेवगाव दौऱ्यावर असताना त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडला (Bhagwangad) भेट देऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री (Dr. Namdev Maharaj Shastri) यांचीही त्यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
शिंदे यांनी भगवानगड परिसराची केली पाहणी
महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यासह शिंदे यांनी भगवानगड परिसराची पाहणी केली. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रगतीपथावरील भव्य मंदिर बांधकामाचा आढावा घेतला. हे मंदिर वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे प्रतीक असून, भविष्यात ते भक्तांसाठी अधिक भव्य व प्रेरणादायी ठरणार असल्याचे शिंदे यांनी आपले भावना व्यक्त केली.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
भगवानगड हे महत्त्वाचे प्रेरणास्थान (Ram Shinde)
भगवानगड हे केवळ धार्मिक स्थळ नसून अध्यात्म, संस्कार आणि संत परंपरेच्या जतनाचे एक महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. या पवित्र स्थळी आल्यानंतर अध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि भक्तिभाव यांचा सुंदर अनुभव मिळाला, असेही त्यांनी भावोद्गार काढले. यावेळी श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे यांचा महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी सत्कार केला.