AMC : नगर : अहिल्यानगर शहरात महापालिकेच्या (AMC) वतीने शहर डेंग्यू (Dengue) मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. शहरांमधील विविध भागामध्ये जाऊन नागरिकांमध्ये व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच नागरिकांच्या घरातील पाणी साठे तपासले जात असून डेंग्यूसदृश अळ्या आढळल्यास त्या नष्ट करून औषध फवारणी व पाण्यामध्ये अबेट औषध टाकण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
कल्याण रोड परिसरात केली पाहणी
महापालिका प्रशासनाच्या वतीने कल्याण रोड परिसरात पाहणी केली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. सृष्टी बनसोडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, जयश्री ढवळे, डॉ. कांचन रच्चा आदींसह विद्यार्थी, नागरिक, शिक्षक उपस्थित होते.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
सचिन शिंदे म्हणाले, (AMC)
महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डेंग्यूमुक्त अभियान सुरू केले आहे. कल्याण रोड शिवाजीनगर परिसरातील नागरिक कष्टकरी हातावरती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यांच्यासाठी कल्याण रोड परिसरामध्ये हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे या नावाने आपला दवाखाना सुरू झाला असून या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दररोज या ठिकाणी ५० ते ६० रुग्ण या दवाखान्याचा लाभ घेत आहेत, असे ते म्हणाले.