Solar Agricultural Pump : पाथर्डी : सौर कृषी पंपाचा (Solar Agricultural Pump) अर्ज नामंजूर करू नये, तसेच सिंगल फेज कनेक्शन, यासाठी अडीच हजारांची लाच (Bribery) घेताना पाथर्डी तालुक्यातील करंजी क्षेत्रातील वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले आहे. राजेंद्र दादासाहेब कराळे, (वय ४१) बाह्यस्त्रोत वायरमन म्हणून पाथर्डी तालुक्यातील करंजी कक्षात सेवा करतात.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
पंप मंजूर करायचा असल्यास ४००० च्या लाचेची मागणी
याप्रकरणातील तक्रारदार असलेल्या व्यक्तीच्या आईच्या नावाने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मंजूर झाला आहे. त्यांच्या शेतात कृषी पंप बसविण्यासाठी वायरमन कराळे हे गेले होते. त्यांनी शेतात आल्यानंतर जागेची पाहणी केली तसेच त्यांच्याकडील मोबाईलमध्ये फोटो काढले व सौर कृषी पंपाचे ठिकाणी लाईटचा पोल आहे, त्याकरिता तुमचा सौर कृषी पंपचा अर्ज नामंजूर होऊ शकतो, त्यामुळे सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास ४००० रुपये द्या, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यावेळी कराळे वायरमन हे सौर कृषी पंपाचा अर्ज नामंजूर करण्याची धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजास्तव त्यांना दोन हजार रुपये दिले होते.
अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार
पंचांच्या समक्ष लाच स्वीकारण्याची तयारी (Solar Agricultural Pump)
त्यानंतर कराळे वायरमन यांनी तक्रारदार यांना उरलेले २००० रुपये सौर कृषी पंप बसवल्यानंतर दे, असे सांगितले व सर्वे पूर्ण करून शेतातून निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांचे शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले. कराळे वायरमन हे तक्रारदार यांचे शेतात कृषी सौर पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पूर्ण केल्याच्या मोबदल्यात २००० रुपये तसेच तक्रारदार यांचे राहते घराचे वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी ५०० रुपये असे एकूण २५०० रुपये लाच मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. दरम्यान, कराळे यांनी पंचांच्या समक्ष करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सापळा लावून राजेंद्र कराळे यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतः २५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.