Garbage Collection : शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधीचा खर्च; तरीही शहरात कचरा तसाच

Garbage Collection

0
Garbage Collection : शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधीचा खर्च; तरीही शहरात कचरा तसाच
Garbage Collection : शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधीचा खर्च; तरीही शहरात कचरा तसाच

Garbage Collection : नगर : शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा (Basic Facilities) पुरविण्याचे काम महापालिका (AMC) करत असते. त्यासाठी शहरातील रस्ते, वीज, स्वच्छता, पाणी, आरोग्यावर मनपाकडून विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने शहर स्वच्छते बाबत श्रीजी एजन्सीला कचरा संकलनाचा (Garbage Collection) ठेका दिला. त्यासाठी मनपा दररोज टनामागे २ हजार ३५० रुपये प्रमाणे एक महिन्याला १ कोटी ५ लाख रुपये खर्च करत आहे. तरीही शहरात कचरा तसाच पडलेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न (Health Issues) निर्माण झाला आहे.

नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या

शहरात दररोज १४० ते १५० टन कचरा

शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील लोकसंख्याप्रमाणे कचर्‍याचे गणित काढले जाते. त्यानुसार प्रति व्यक्ती ३०० ग्रॅम असे चार लाख लोकसंख्यासाठी दररोज शहरात १४० ते १५० टन कचरा शहरात साचला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडून श्रीजी एजन्सी या खासगी संस्थेला ठेका देण्यात आला आहे. सध्या या एजंसीकडून कडून वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येते. त्यासाठी मनपा या ठेकेदाराला २ हजार ३५० रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे मोजत आहेत. 

Garbage Collection : शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधीचा खर्च; तरीही शहरात कचरा तसाच
Garbage Collection : शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधीचा खर्च; तरीही शहरात कचरा तसाच

अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार

खर्च होवूनही शहरात ठिक-ठिकाणी कचरा पडून (Garbage Collection)

अहिल्यानगर शहरातील सावेडी, केडगाव, माळीवाडा, बुरूडगाव येथे घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. त्यासाठी ठेकेदाराचे वाहने तसेच महापालिकीचे ६२ घंटागाड्या, ६ कॉम्पॅक्टरद्वारे कचरा उचलला जात आहे. हा कचरा बुरडगाव येथील कचरा डेपोत टाकला जात आहे. दररोज अंदाजे १४० ते १५० टन कचरा शहरात साचला जात आहे. त्यासाठी मनपाकडून अंदाजे दररोज सुमारे ३ लाख ५२ हजार तर महिन्याला १ कोटी ५ लाख ७५ हजार रुपये खर्च होत आहे. तर वर्षासाठी १२ कोटी ६७ लाख रुपये खर्च केला जात आहे. खर्च होवूनही शहरात ठिक-ठिकाणी कचरा पडून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असून महापालिकेच्या माजी नगरसेवकांना स्वखर्चातून कचरा संकलन करण्याची वेळ येत असेलतर महापालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.