Elections : जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार

Elections : जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार

0
Elections : जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार
Elections : जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार

Elections : जामखेड: जामखेड नगरपरिषदेच्या (Jamkhed Municipal Council) २०२५ ते २०३० साठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Elections) प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे (Ajay Salve) यांनी सोमवारी (ता.१८) प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार

हरकतीवर ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान सुनावणी

या हरकती व सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करावयाच्या आहेत, तर प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांसंदर्भात हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी नगरपरिषदेमार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरदरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान सुनावणी नंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांमार्फत नगरविकास विभागास सादर करण्यात येणार आहेत.

नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या

२६ ते ३० सप्टेबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर (Elections)

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागामार्फत १२ सप्टेंबर ते १८ सप्टेबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येईल, तर २६ सप्टेंबर ते ३० सप्टेबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगा मार्फत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.