Politics : संप्रदायातील काही व्यक्तींकडून राजकारणाच्या नादात हिंसेला खतपाणी; दीप चव्हाण

Politics : संप्रदायातील काही व्यक्तींकडून राजकारणाच्या नादात हिंसेला खतपाणी; दीप चव्हाण

0
Politics : संप्रदायातील काही व्यक्तींकडून राजकारणाच्या नादात हिंसेला खतपाणी; दीप चव्हाण
Politics : संप्रदायातील काही व्यक्तींकडून राजकारणाच्या नादात हिंसेला खतपाणी; दीप चव्हाण

Politics : नगर : कीर्तनकार जर राजकारणाच्या नावाखाली धमक्या देऊ लागले तर समाजात चुकीचा संदेश जाईल. वारकरी संप्रदायाचे (Varkari-sampraday) कार्य म्हणजे प्रबोधन आणि समाजजागृती; परंतु जर त्याच संप्रदायातील काही व्यक्ती राजकारणाच्या (Politics) नादात हिंसेला (Violence) खतपाणी घालत असतील, तर ते वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेला डाग लावणारे आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण (Deep Chavan) यांनी केले आहे.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

बाळासाहेब थोरात हे राज्यातील ज्येष्ठ नेते,

माजी महसूल मंत्री तसेच सुसंस्कृत व संयमी नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौजन्य, सुसंस्कृतपणा आणि लोकशाहीची आस्था स्पष्टपणे दिसून येते. अशा नेत्याला थेट जिवे मारण्याची धमकी देणे ही अतिशय निंदनीय आणि लोकशाहीविरोधी बाब आहे. स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे यांनी दिलेली ही धमकी केवळ संतपरंपरेच्या पवित्र भूमीचा अपमान नाही, तर वारकरी संप्रदायालाही न पटणारी आहे. 

अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

परंपरेचा आडोसा घेऊन हिंसेला खतपाणी घालणे चुकीचे (Politics)

वारकरी परंपरेला प्रबोधनाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनी वारकऱ्यांच्या माध्यमातून समाजात शांतता, सहिष्णुता आणि नैतिकतेचा संदेश दिला. हा वारसा असलेल्या परंपरेचा आडोसा घेऊन हिंसेला खतपाणी घालणे हे संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचा अपमान करणारे आहे.कीर्तनकार जर राजकारणाच्या नावाखाली धमक्या देऊ लागले तर समाजात चुकीचा संदेश जाईल. “नाठाळाचे माथी हाणू काठी” ही संतांची शिकवण लक्षात ठेवून वारकरी समाजाने अशा प्रवृत्तींचा वेळेवर निषेध करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन तथाकथित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहिल्यानगर शहर काँग्रेसच्या वतीने केली आहे.